breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

क्या बात हैं! दुधाने मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला; पाहा बाप लेकीचा भावूक व्हिडीओ

बापलेकीचं नातंच निराळं असतंय. फक्त शब्दांत त्याचं वर्णन करणं अशक्यच जणू. लहानपणापासून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली लेक कधीतरी परक्या घरी जाईल या भीतीने बापाचा जीव कासावीस होत असतो. पण परंपरेने चालत आलेली रीत सांभाळत तो त्या एका क्षणाला सामोरे जातोच. आपल्या चेहऱ्यावरील ताण बाजूला ठेवत कोणताही बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना मात्र हळवा होतोच.

सध्या असाच बापलेकीचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाप लेकीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही लहान मुलींच्या पहिल्या गृहप्रवेशाचे आणि मुलींच्या पाठवणीचे अनेक भावनिक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. 

To watch video click image above

व्हिडीओमधील मुलीचं लग्न ठरलं आहे. लग्नाआधीच्या विधींपैकीच हा एक विधी आहे. यामध्ये बाप आपल्या लेकीचे दुधाने पाय धुतो आहे आणि तेच दूध स्वतः पितो आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता मुलगी खुर्चीवर बसली आहे. तिच्या पायाखाली एक ताट ठेवून तिच्या वडीलांनी आधी पाण्याने तिचे पाय धुतले, त्यानंतर दुधाने पाय धुतले. तिचे पाय धुऊन ताटात पडलेलं दूध त्यांनी पुन्हा वाटीत जमा केलं आणि ते स्वतः प्यायले. वडीलांचे असे लाड करताना पाहून मुलीलाही अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.

वडील मात्र मोठ्या कौतुकाने आणि मन लावून मुलीचे पाय धुत आहेत. तिनं आपल्या वडीलांना ते दूध पिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र वडीलांनी तिला थांबवलं आणि ते दूध प्यायले. त्यानंतर पुन्हा तिचे पाय धुतले आणि एका पांढऱ्या कपड्यावर आपल्या लाडक्या लेकीच्या पाऊलखुणा त्यांनी घेतल्या. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भावूक झाले आहेत.

अवश्य वाचा:

https://mahaenews.com/177543/
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button