breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अकोला : १५ दिवसांचे बिबट्याचे बछडे आईवीना पोरके… वनविभागाने दिली ‘ममता’

अकोला । येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे पास्टूल येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अवघ्या  १५ दिवस बिबट्यांच्या चारही पिलांना मायेने सांभाळत आहेत.

विशेष म्हणजे, वन विभागाचे कर्मचारी बकरीचे दूध पाजून बिबट्यांचे संगोपन केले. १५ दिवसांपूर्वी सापडलेल्या या बिबट्यीची आई पुन्हा परतलीच नाही. हे चार बछडे आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक वि.ग. माने यांनी दिली आहे.

३० जून रोजी मौजे पास्टूल जवळ मोर्णा नदीच्या पात्रात  बिबट्याची तीन पिले सापडली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१ जुलै रोजी आणखी एक पिलू सापडलं. तिथल्या नागरिकांनी वनविभागाच्या पातूर वनपरिक्षेत्रातील  खानापूर नियतक्षेत्राच्या भाग २ मधील अधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यावेळी ही पिले १५ दिवस ते तीन आठवडे इतक्या वयाची असावीत.  त्यांची आई जवळपासच असावी, आणि ती परतेल अशा अपेक्षेने त्यांच्या आईची वाट पाहण्यात आली. पण ती आली नाही. मग त्यांना जंगलातच पण थोडं सुरक्षित स्थळी आणून ठेवण्यात आलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात ही पिले होती. पिलं खूप लहान असल्याने  अन्य श्वापदांकडून धोका होताच, त्यांना जगवायचंही होतं आणि शिवाय त्यांची आई आलीच तर या पिलांना सुखरुप तिच्या हवालीही करायचं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button