breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त 20 टक्के कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हात वारंवार धुणे आदींसह प्रत्येकाने स्वत:ची प्रतिकार शक्ती वाढवावी. भीती न बाळगता यापुढे कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि. १०) फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, कोरोना संकटाची भीती मनातून काढून टाका. स्वत:वर बंधने घालून घ्या. गरज नसताना घरातून बाहेर पडू नका. प्रतिकार शक्ती वाढवा आणि कोरोनासोबत जगायला शिका. शंभरपैकी केवळ २० टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. खऱ्या अर्थाने ते २० टक्केच रुग्ण आहेत. लक्षणे नसलेल्यांना घरीच आयसोलेशन तसेच, क्वारंटाईन केले जात आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

दहा वर्षांखालील मुले व ६५ वर्षांवरील ज्येष्ठांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. सोमवारी (दि. १३) मध्यरात्रीपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन अल्प मुदतीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी साहित्य खरेदीसाठी दुकाने व बाजारपेठेत नाहक झुंबड करून गर्दी करू नये. केवळ ५ दिवसांसाठी लागणारे साहित्य घेऊन ठेवावे. त्यासाठी ३ दिवसांचा वेळ दिला आहे. शहरातील लॉकडाऊनबाबतच्या अटी व नियम शनिवारी (दि. १४) किंवा रविवारी (दि. १५) जाहीर केल्या जातील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button