breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एक विश्वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा चिखलीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोणा विषाणुचा संसर्ग होऊन दुःखद निधन झाल्याने राजकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व तसेच विश्वासू मार्गदर्शक मित्र हरपला, अशी भावना व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली आहे.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, मी राजकारणात येण्यापूर्वीपासून माझे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. राजकारणात काही दिलखुलास व्यक्तिमत्त्व असतात त्यापैकी दत्ता साने एक होते. मित्रत्वाच्या नात्याने मी कधीही त्यांना फोन केला तर ते मदतीला धावून यायचे. त्यामुळे एक विश्वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली.

दत्ता साने यांचे अचानक जाणे माझ्यासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button