breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना अफेवेने महिला पोलिसाच्या कुटुंबाचं पाणी बंद करून घरावर बहिष्कार

पुणे – कोरोनो व्हायरसने देशभर थैमान घातले असताना, नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झालीय, अनेक अफवा देखील सोशल मीडियावर पसरत असतात असाच प्रकार दौंड तालुक्यातील भरतगाव या ठिकाणी घडलाय, कर्तव्य बजावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफवेने अक्षरशः तिच्या घरच्यांचे पाणी बंद करून घरावर बहिष्कार टाकण्यात आलाय,सदर महिला कॉन्स्टेबल ही दंगल नियंत्रण पथकात सेवेत असून या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झालीय अशी अफवा गावामध्ये पसरली, आणि या अफवेने गावातील काही नागरिकांनी अक्षरशः या कुटुंबाचे पाणी बंद केले आहे.

दौंड तालुक्यातील भरतगाव येथील महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफेवेमुळे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबालाच फटका बसलाय. या महिलेस खोकला व सर्दी असल्याने ही सुट्टी घेऊन आपल्या घरी भरतगाव या ठिकणी आली होती, मात्र खोकला असल्याने तिला कोरोना झालाय या अफवेने गावातील लोक पाणीही देत नाही.

अत्यावश्यक गोष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे या महीलेने सांगितलं. तर सदर महिलेला कोरोना झाला नसून तसे तिला सर्टिफिकेट देखील देण्यात आले असून अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button