ताज्या घडामोडी

यंदाचा “आशा भोसले पुरस्कार” सुप्रसिध्द पार्श्वगायक शान यांना जाहीर

पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे दिला जाणारा यंदाचा “आशा भोसले पुरस्कार” सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान (शांतनु मुखर्जी) यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे २० वे वर्ष असून, १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषद दिली.
यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर, चिंचवड पुणे-३३ येथे होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने व सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत गेली २४ वर्षांपासून जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावे “आशा भोसले पुरस्कार” दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारास आशाजीच्या वाढदिवशी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार जाहीर केला जातो. आजपर्यंत लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायणजी, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत “रजनीगंधा” हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य सादर होईल. तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button