breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पहिली महिला जिचे दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झाले होते…अखेर तिचे निधन!

सातारा । प्रतिनिधी

2017 साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि कोमलचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिचे पती धिरज यांनी धीर सोडला आणि आणि तिला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढले, आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती.

पण ४ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धिरज यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले,

आज सकाळी उठून मोबाईल हातात घेऊन पाहतो तर काय, कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली. एक चांगली स्त्री शक्तीला आधार देणारी  कोमल गमावली होती.

कोमल आणि धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत ते ऑर्गन डोनेशन साठी वाटेल ती मदत, जनजागृती करत.पूर्वाश्रमीचे नाव कोमल दिलीप पवार, विवाहानंतर चे नाव  कोमल धीरज गोडसे. पत्ता 302 गजानन दर्शन अपार्टमेंट, महेंद्र हॉटेल समोर, एन एच 4 खेड ,सातारा.शिक्षण- एम. ई. सिव्हिल. कोमल यांचे शालेय शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट येथे झाले व इंजिनीअरिंगचे शिक्षण रयत शिक्षण संस्था सातारा येथे झाले. पुणे विद्यापीठातून एम ई सिव्हिल ही पदवी घेतली त्यानंतर त्यांनी यशोदा इंजीनियरिंग कॉलेज सातारा येथे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये विवाह झाल्यानंतर अचानक चार महिन्यांनी “प्रायमरी पल्मनरी हायपर टेन्शन” या दुर्धर आजाराचे निदान झाले. हा आजार कधीही बरा न होणारा होता. यामध्ये फुप्फुस  निकामी होते. एक ते दीड वर्ष अनेक ठिकाणी उपचार चालू होते व जगण्याची शक्यता अतिशय कमी म्हणजे जेमतेम सहा महिने असे सांगितले जात होते. शेवटचा पर्याय म्हणून अवयव बदलण्याची अवघड शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल चेन्नई येथे डॉक्टर संदीप आत्ता वर यांचे देखरेखीखाली ठेवण्यात आले तेथे गेल्यावर हृदय सुद्धा निकामी झाले  आहे हे लक्षात आले. हृदय व फुफ्फुसे प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे असे डॉक्टरांनी सांगितले. नियतीच्या चक्रव्यूहात अडकून भयानक काळरात्री नंतर संघर्षमय उषःकाल झाला व गतप्राण होत आहे .

असे वाटत असतानाच हृदय व फुफ्फुस रोपण करून डॉक्टर संदीप आत्तावर, चेन्नई यांनी 30 डॉक्टरांच्या सहकार्याने एका शरीरात अक्षरशहा फुंकर घालून २८ मे २०१७ या दिवशी महाराष्ट्रातील पहिली हृदय व फुफ्फुस रोपणाची शस्त्रक्रिया सोळा तासात यशस्वी करून कोमल पवार या व्यक्तीचा पुनर्जन्म केला.                अक्षरशः चमत्कार रुपाने मिळालेले आयुष्य, अवयवदानाची जागृती व महत्त्व या विषयावर व्यतीत करणाऱ्या कोमल पवार यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. “कोमल न्यू लाइफ फाउंडेशनची स्थापना”       ही शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील पहिली असल्यामुळे  कोमल सारखे अनेक रुग्ण असतील की ज्यांना या शस्त्रक्रियेबद्दल माहिती नसून अशी शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते हे लोकांच्यात अज्ञान आहे. आपल्याला कोणीतरी अवयव दान केले आहे याची जाणीव, तसेच लोकांनी शस्त्रक्रियेसाठी दिलेले आर्थिक सहाय्य आणि मिळालेले आशीर्वाद, याच प्रेरणेतून आपल्या आयुष्याचा सदुपयोग करण्याच्या  इच्छेने प्रेरित होऊन समाजकार्याच्या माध्यमातून अवयव दानाचा हा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. या कार्याला समर्थ दिशा मिळण्यासाठी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची उभारणी केली गेली आहे. या साठी त्यांचे पती श्री धीरज विलासराव गोडसे यांची खंबीर साथ त्यांना लाभली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचे रुग्ण, त्यांचे नातलग यांना योग्य दिशा देणे  व उपचार पद्धत सांगणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे तसेच या बाबतीत समुपदेशन करणे आणि शक्य असल्यास आर्थिक मदत करणे हे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. महाराष्ट्रात अशा शस्त्रक्रिया होण्यासाठी अवयवदानाचे प्रमाण वाढले पाहिजे म्हणून अवयवदानाची जनजागृती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात केली जात आहे तसेच कोमल पवार यांचा जीवनपट अत्यंत प्रेरणादायी असल्यामुळे त्याद्वारे युवा जनजागृती केली जात आहे. हा संदेश पोहोचवण्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी 150 ठिकाणी सभा द्वारे जनजागृती केली आहे. भारतात व भारताबाहेर जवळजवळ 500 रुग्णांना मार्गदर्शन झाले आहे. कोमल पवार या स्वतः प्रत्यारोपण रुग्ण असून प्रत्यारोपणासाठी जाणाऱ्या रुग्णांना प्रेरणा मिळावी म्हणून अनेक मॅराथॉन, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग यामध्ये सहभागी होऊन स्वतःची शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. आकाशवाणी, माय मेडिकल मंत्रा, fm gold Mumbai.. josh talk.international TEDX मुंबई येथे त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती झाल्या आहेत .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button