breaking-newsक्रिडा

#WWCHs2018 : सोनिया आणि मेरी यांच्याकडून आज सुवर्णपदकाची आशा

नवी दिल्ली – जागतिक महिला अंजिक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा दोनवर पोहचल्या आहेत. माजी विश्वविजेत्या मेरी कोम हिच्या पाठोपाठ आता भारताच्या सोनिया चहलनेही शुक्रवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताला आता दोन सुवर्णपदक पटकाविण्याची संधी आहे. भारताने आतापर्यत या स्पर्धेत दोन कांस्यपदके पटकावली आहेत.

आज शनिवारी 4 वाजता सोनिया हिची अंतिम फेरीत  57 किलो वजनी गट प्रकारात कजाखिस्तानच्या बाॅक्सिंगपटू विरूध्द सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. तर दुसरीकडे भारताची आघाडीची बाॅक्सिंगपटू मेरी कोम हिचा सुध्दा आज 4 वाजता 48 किलो वजनी गटात अंतिम लढतीचा सामना होणार आहे. मेरी कोम हिचा सामना युक्रेनच्या हेना अोखोता विरूध्द होणार आहे.

अंतिम लढतीचा सामना हा दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमध्ये आज 4 वाजता सुरू होणार आहे.

SAIMedia

@Media_SAI

Come on India, let’s join in cheering for our boxers, the veteran @MangteC going for her 6th world c’ship gold & Sonia who is a debutant at the championships. Matches start at 4 PM and will be held at the KD Jadhav Indoor Hall at New Delhi’s IG Stadium. @BFI_official

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button