breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कपात

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीमुळे देशांतर्गत इंधन दरात कपात सुरु आहे. याआधी बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले होते. तर सोमवारी आणि मंगळवारी इंधन दरात कपात केली होती.पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली. आज पेट्रोल आणि डिझेल १३ ते २० पैशांनी स्वस्त झाले आहे.

मुंबईत पेट्रोल दर प्रती लीटर ८८.०८ रुपये आहे. तर डिझेल ७८.०८५ रुपये झाले आहे. पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.४० रुपये असून डिझेलचा भाव ७२.३७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.४४ रुपये असून डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.९२ रुपये आहे. डिझेल ७८.८५ रुपये प्रती लीटरपर्यंत घसरले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीमुळे देशांतर्गत इंधन दरात कपात सुरु आहे. याआधी बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये कोणताही बदल केला नाही. तर त्याआधी मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. तर सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते.

पेट्रोलियम कंपन्यांनी मागील सहा दिवसांत चार वेळा इंधन दर कमी केल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले.१६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button