breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus |२४ तासांत ५४९ नवीन रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय.

उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १६६ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातील १७ मृत्यू मंगळवारी – बुधवारी झाल्याची नोंद करण्यात आलीय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button