breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलण्यात येणार

कोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळ्याची तारीख बदलण्यात येणार आहे. मार्च माहिन्याच्या अखेरीस आयफा  पुरस्कार सोहळा पार पडणार होता मात्र खबरदारी म्हणून इंदूरमध्ये होणारा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 

मार्च महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये हा बहुप्रतिक्षीत सोहळा पार पडणार होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हा सोहळा रद्द करत आहोत, असं आयफाच्या कमिटीनं सांगितलं आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात येईल असंही  कमिटीनं सांगितलं  आहे. 

२१ मार्च रोजी भोपाळमध्ये आयफा प्री इव्हेंट  कार्यक्रम होणार होता. तर २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान इंदुरमध्ये हा तीन दिवसीय कार्यक्रम पार पडणार होता. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button