breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नोटिसा बजावूनही अनधिकृत बांधकामांना ‘उत’, नऊ जागामालकांना पालिकेचा ‘दणका’

  • अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती
  • नोटिसींचे उल्लंघन करणा-यांची आता खैर नाही

पिंपरी / महाईन्यूज

अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने जागामालकांना नोटिसा दिल्या. त्याला केराची टोपली दाखविणा-या नऊ जागामालकांवर महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सन 1949 चे कलम 396 (अ)(1)(ब) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. या तक्रारींमुळे अनधिकृत बांधकामांना आळा बसेल अशी आपेक्षा व्यक्त होत आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यांतर्गत गट 452 साईदत्त प्रॉपर्टीज, खडी मशिन रोड मोशी याठिकाणचे अनधिकृत बांधकामाचे मालक मनोज पांडुरंग नवगिरे आणि सुनिल बबन कुदळे या दोघांना अवैध बांधकाम हटविण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली होती. त्याचे अनुपालन न केल्यामुळे त्यांच्याविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे कर्मचारी हेमंत प्रभाकर देसाई (वय 49, रा. रेणुका गोविंद अपार्टमेंट कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी तक्रार दिली.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी विठ्ठल बाबुराव शिंदे (वय 51, रा. विसावा हॉटेल मागे, रेल्वे गेटखाली 1/494), विजय चुनीलाल शहा (वय 25, रा. स. नं. 6941/1, गव्हाणे वस्ती, भोसरी), अजय मुरलीधर पिसाळ (रा. गव्हाणे वस्ती, पुणे) यांना नोटिसा बजावल्या होत्या. नोटिसीतील आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हेमंत प्रभाकर देसाई यांनी तक्रार दिली आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्या मुरलीधर अंबुसकर (रा. गट नं. 174, खडीमाशीन रोड, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी रेडझोनमध्ये बांधकाम केले आहे. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. दत्तात्रय त्रिंबक वायकर (रा. गट नं. 174 खडीमशीन रोड, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी देखील रेडझोनमध्ये बांधकाम केले. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. मुकेश तुकाराम देवकर ( गट नं. 174 खडीमशीन रोड, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी देखील अशाच प्रकारचे विनापरवाना बांधकाम केले आहे. शितल नितीन पाटील (गट नं. 174 खडीमशीन रोड, वडमुखवाडी, ता. हवेली. जि. पुणे) यांचे देखील रेडझोनबाधित बांधकाम आहे. त्यासाठी त्यांनी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. यासंदर्भात हेमंत प्रभाकर देसाई यांनी तक्रार दिली आहे.

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सन 1949 चे कलम 396 (अ)(1)(ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button