breaking-news

corona virus : कोरोनाचा उगम मासळी बाजारातून नव्हे, तर बायो वेपनमुळे

औरंगाबाद | महाईन्यूज

चीनच्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरस झाला, असे सांगितले जात असले तरी चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याचे खळबळ जनक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धोरणाचे प्रसिद्ध अभ्यासक शरद देवळाणकर यांनी केले.

जीवन विकास ग्रंथालयाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मोदींचे परराष्ट्र धोरण : सातत्य, स्थित्यंतर आणि आव्हाने’ यावर ते बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी न्या. अंबादास जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. यावेळी प्रश्नोत्तरेही रंगली.पुढे बोलताना ते म्हणाले, चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला, हे वेपन कुणाविरुद्ध वापरला जाऊ शकले असते, तर अर्थातच भारताविरुद्ध. चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत. मात्र, ते हे जाहीर करीत नाहीत. या कंपन्या बंद पडल्यामुळे आणि चीनच्या स्वस्त वस्तू भारतात येणे बंद झाल्यामुळे महागाई वाढणार, हे निश्चित. ५७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत चीनकडून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button