breaking-newsमहाराष्ट्र

कोरोनामुक्त धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात लावली हजेरी!

बीड : धनंजय मुंडे गेल्या महिन्यातच ‘कोरोना’मुक्त झाले होते. पण त्यानंतर काही दिवस ते ‘कॉरन्टाईन’ होते. त्यांचा ‘कॉरन्टाईन’चा कालावधी ५ जुलै रोजी संपला. त्यानंतर ते आता लगेचच कामाला लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘कोरोना’मुक्त झालेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ‘कॉरन्टाईन’चाही कालावधी संपला आहे. त्यामुळे मुंडे यांनी मंत्रालयात उपस्थिती नोंदविली. यावेळी त्यांनी नियमित कामकाजाचा आढावा घेतला.

विशेष म्हणजे, कॉरन्टाईनच्या कालावधीतही त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला होता. घरूनच ते ‘झूम’द्वारे मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्याशिवाय त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासोबत वेगवेगळ्या ऑनलाईन बैठकाही घेतल्या होत्या.

‘कोरोना’मुळे राज्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रत्येक खात्यातील ३३ टक्के खर्च कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याने ३३ टक्क्यांच्या मर्यादेत आपल्या योजनांचा सुधारित आराखडा सादर करण्याबाबत सरकारने सुचना केल्या आहेत.

याबाबत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आपल्या खात्याचा सुधारित अर्थसंकल्पीय आराखडा तयार केला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button