breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाबाधितांसाठी मुंबई पालिकेला सुपूर्द केलेल्या म्हाडाच्या तीन इमारतींची दुरवस्था

कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण केंद्राची सेवा उपलब्ध करू देणाऱ्या म्हाडा प्राधिकरणास मुंबई पालिकेच्या विचित्र अनुभवास सामोरे जावे लागत आहे. म्हाडाने चेंबूरमधील सहकारनगर येथील शेल कॉलनीतील तीन इमारती २०१९च्या सोडतीसाठी उपलब्ध केल्या होत्या. पालिकेने यातील दोन इमारती विलगीकरण केंद्रासाठी घेतल्या होत्या. आता त्या पुन्हा म्हाडाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहोते. मात्र पालिकेकडून या इमारतींसह तिथल्या घरांची योग्य निगराणी न राखली गेल्याचे त्यांची दुरवस्था झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू लागल्यानंतर मुंबई पालिकेने म्हाडा, एसआरएच्या रिकाम्या इमारती विलगीकरण केंद्रासाठी म्हणून ताब्यात घेतल्या. त्यात सहकारनगरमधील म्हाडाच्या २, २३, ३७ या तीन इमारतींचाही समावेश होता. त्यातील २ आणि ३७ क्रमांकाच्या इमारती प्रत्यक्ष विलनीकरण केंद्र म्हणून वापरण्यात आल्या. या इमारती १३ मजली असून, त्यातील प्रत्येक मजल्यावर चार घरे आहेत. म्हाडाच्या सोडतीतील विजेते या तिन्ही इमारतींतील घरांचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्यांचा ताबा घेण्यापूर्वीच करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर या इमारती विलगीकरण केंद्रासाठी देण्यात आल्याने त्यास विलंब होत आहे. सोडतीतील बहुसंख्य विजेत्यांनी घरांसाठी कर्जे घेतली आहेत. त्या कर्जांचे हप्तो फेडणे सुरू झाले असले तरी घरांचा ताबाही लांबला असल्याने ते त्रासले आहेत.

पालिकेने ३१ जुलैला दोन्ही इमारती पुन्हा म्हाडास सुपूर्द केल्या आहेत. मात्र तिथली अनास्था पाहून अनेकांनी चीड व्यक्त केली आहे. या ठिकाणी अस्वच्छता, तुटलेल्या खिडक्या, ठिकठिकाणी पडलेली घाण आदींनी या इमारतींची दुरवस्था झाली आहे. एखादी वास्तू तात्पुरत्या स्वरूपात वापरून परत देण्याच्या वेळेस त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये, अशी काळजी घेणे अपेक्षित आहे. पण पालिकेने त्याची कोणतीही बूज न राखल्याची टीका केली जात आहे.

या इमारती परत देताना त्यात स्वच्छतेचा अभाव असून गटाराची झाकणे गायब होण्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. घरांच्या खिडक्या तुटण्यापासून घरातील लाद्या तुटण्यासह अनेक तक्रारी आहेत. घरे, इमारतींच्या आवारात केरकचरा तसाच पडला आहे. दरम्यान, इमारत २मध्ये काही घरमालक राहण्यास आले असले तरीही त्यांना खंडित वीज आणि पाणीपुरवठा अशा अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button