breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 1037, पुण्यात 739 नवे कोरोना रुग्ण, राज्याचा रिकव्हरी रेट 92.76 टक्क्यांवर

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून उच्चांक गाठलेल्या कोरोना रुग्णांमध्ये आता काही दिलासा मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात 24 हजार 136 नवे रुग्ण बाधित झाले तर 36,176 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी 601 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकदा दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यात सध्या एकूण 3,14,368 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संपूर्ण एप्रिल महिना सातत्याने आणि वेगाने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं मे महिन्यामध्ये माघार घेतल्याचं दिसून येत आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात या संख्येत लक्षणीय घट आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट गेल्या महिन्यातल्या ८२ टक्क्यांवरून थेट ९२.७६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या आकड्यांमुळे राज्यातली आत्तापर्यंत पॉझिटिव्ह झालेल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी ५६ लाख २६ हजार १५५ पर्यंत गेली आहे. मात्र, त्यातले फक्त ३ लाख १४ हजार ३६८ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत मंगळवारी दिवसभरात १०३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९९ हजार ९०४ वर गेली आहे. मात्र, त्याचवेळी १ हजार ४२७ रुग्णांना मंगळवारी दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५ इतकी झाली आहे. पण दिवसभरात झालेल्या ३७ मृत्यूंमुळे मृतांची संख्या देखील वाढून १४ हजार ७०८ इतकी झाली आहे.

पुणे शहरात दिवसभरात ७३९ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आज अखेर ४ लाख ६६ हजार ८५८ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ हजार ७८ झाली. त्याच दरम्यान १ हजार ५६० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ४९ हजार ९१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button