breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भेसळखोरांना आता आजन्म कारावास

दूध किंवा अन्य खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नसून भेसळीचे सर्व गुन्हे यापुढे दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आले आहेत. अशा गुन्ह्य़ांत आजन्म कारावासाची शिक्षा देण्याच्या कायदेशीर सुधारणांना गुरुवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली.

दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत हरतऱ्हेची भेसळ होत असल्यामुळे आबालवृद्धांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीमुळे क्षयरोग होतो. युरियाची भेसळ असल्यास त्याचा मूत्रपिंड, यकृत व हृदयावर परिणाम होत असून कॉस्टिक सोडय़ामुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या या भेसळीवर र्निबध आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून त्याचाच एक भाग म्हणून भेसळीसंदर्भातील कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. त्यानुसार दूध तसेच खाद्यपदार्थातील भेसळ हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.

भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम २७२ व २७३ मध्ये सुधारणा करणारे विधेयक गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत मांडले. या दुरुस्तीनुसार आता अशा प्रकारचे गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र करण्यात आले असून यासाठी आजन्म कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. या विधेयकास विधानसभेत चर्चेशिवाय मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button