breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनाची लस संपूर्ण देशवासियांना मोफत मिळणार; केंद्र सरकारची घोषणा

नवी दिल्ली – देशात हळूहळ कोरोना लसींना मान्यता दिली जात असताना ती निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. केंद्र सरकारने याबाबत नववर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना लसीचं मोफत वितरण केलं जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना लसीचं कोणत्याही क्षणी वितरण केलं जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशभरात टिकाकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे. दिल्लीतही या ड्राय रनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चार राज्यात ड्राय रन करण्यात आलं असून त्याचा फिडबॅक मिळाला आहे. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज ड्राय रन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे ड्राय रन सुरू असून यावेळी नियमांचं पालन केलं जात आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

त्याचबरोबर ‘देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे’, असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button