TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिंदू हा देशभक्त असतोच भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा सवाल, म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभक्त आणि हिंदू याबद्दल एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असूच शकत नाही, असे भागवत म्हणाले होते. यावर आता एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गाधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबाबत काय विचार आहे? असा खोचक सवाल मोहन भागवत याना केला आहे.

भागवत यांच्या वक्तव्यानंतर ओवैसी यांनी ट्विट करत सवाल केला आहे. गांधींजींचा हत्यारा गोडसेबाबत काय मत आहे? नेली नरसंहार, 1984 च्या शीख विरोधी आणि 2002 गुजरात नरसंहारसाठी जबाबदार लोकांबाबत बाबत काय मत? याचे भागवत उत्तर देतील का ?, असा सवाल ओवैसींनी केला आहे.

धर्मातील भेदभावाशिवाय अधिकतर भारतीय देशभक्त आहेत. ही फक्त आरएसएस संदर्भहिन विचारधारा असू शकते जी एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचे सर्टिफिकेट देत आहे. तर बाकी लोकांना आपलं जीवन देशभक्ती सिद्ध करण्यात घालवावं लागतं, असेही म्हणत त्यांनी संघावर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button