breaking-newsआंतरराष्टीय

कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन कोमामध्ये

प्योंग्याग – अमेरिकेसहित संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रांची भीती दाखविणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची तब्येत पुन्हा बिघडली असून ते कोमात गेले आहेत. हुकूमशहा किम जोंग उन कोमामध्ये गेल्याची घोषणा उत्तर कोरियाचे माजी राष्ट्रपती डेई जुंग यांचे माजी सहकारी चांग सॉंग मिन यांनी केली आहे. किम जोंग उन यांच्या आजारपणाच्या काळात उत्तर कोरियाची सत्ता त्यांची बहीण किम यो जोंग यांच्या हातात सोपवलेली आहे, असाही दावा चांग सॉन्ग मिन यांनी केली आहे.

किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांच्यावर अमेरिकेसहित शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध सुधारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या प्रसिद्धी माध्यमांनी किम जोंग उन सध्या कोमात असले तरी त्यांचा मृत्यू झालेला नाही, असे सांगितले आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत नेहमीच अफवा उठत राहिल्या आहेत. यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्या मृत्यूची बातमी आलेली होती. यापूर्वी ते तब्बल 20 दिवस जगाच्या नजरेपासून दूर राहिले होते. त्यावेळीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या जगभर पसरलेल्या होत्या. मात्र एक दिवस ते चक्क फर्टीलायझर कंपनीच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आले. आजही उत्तर कोरियाच्या प्रसिद्धी माध्यमांनी किम जोंग उन हे कोमामध्ये आहेत, याची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था किम जोंग उन कोमात असल्याची घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत तरी संशयाची स्थिती कायम राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button