breaking-newsराष्ट्रिय

हृदयविकाराच्या आजारामुळे रामविलास पासवान दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना हृदयविकाराच्या आजारामुळे दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामविलास पासवान हे बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. रामविलास पासवान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार याची घोषणा रविवारी झालेली आहे. त्याच वेळी रविवारी दिल्लीमध्ये बिहार मधील जागावाटपाची ही प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर रामविलास पासवान यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. रामविलास पासवान यांना हृदयविकाराचा जुना आजार आहे. यापूर्वी अनेक वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आताही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button