breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: सायन हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर, रुग्णांचे हाल; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता

डॉक्टर मला लघवी करायची आहे, कोणाला तरी पॉटी साठी पाठवा ना, तो रुग्ण कळवळून सांगत होतो…. कुठे बेडवरची चादर बदलायची आहे… तर कुठे मृतदेह हवलायचा आहे… मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सध्या पराकोटीची कमतरता असल्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण सगळ्यांचे हाल होत आहेत.

करोना संशयितांसाठी शीव रुग्णालयात पाच वॉर्ड तयार करण्यात आले असून रुग्णालयाची बहुतेक व्यवस्था हे निवासी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी हाताळत आहेत. वॉर्डात रुग्णांसमवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना उपचारापासून ते कधी रुग्णांच्या शिव्याशापही खावे लागत आहेत. तर कधी त्यांच्या आर्त विनवण्या ह्रदय पिळवटून टाकतात असे काही निवासी डॉक्टरांनी सांगितले. या रुग्णांवर उपचार करायचे की त्यांच्या चादरी – कपडे बदलण्यापासून ते पॉटी देण्यापर्यंत काय काय करायचे असा त्यांचा सवाल आहे. यातूनच मग हे निवासी डॉक्टर आपला राग व्यक्त करतात ते वैद्यकीय अधिकारी असलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांवर… बरे त्यांनाही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button