breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. पद्माकर पंडीत यांची वायसीएममधून हकालपट्टी करा – दत्ता साने

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी पदावर डॉ. पद्माकर पंडीत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची मुदत संपुष्टात आलेली असताना प्रशासनाकडून नियमबाह्य या अधिका-याला पोसले जात आहे. महाविद्यालयाचे काम अद्याप सुरू झाले नसून पंडित यांना शासन सेवेत पाठवा. नवीन तज्ञ अनुभवी अधिका-याची त्याजागी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

यासंदर्भात साने यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (Post Graduate Institute) सुरु करण्यास भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. सदर वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे कामकाज पाहण्यासाठी मनपाने शासनाकडे सहा महिन्याकरीता अधिष्ठाताची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने १ वर्षासाठी डॉ. पद्माकर पंडीत, प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक वर्ष मुदत संपल्यानंतर नगरविकास विभागाने अजून एक वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. या एक वर्ष मुदतवाढीची महापालिकेची मान्यता घेण्यात आलेली नाही. प्रतिनियुक्तीचा कालावधी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी संपुष्टात आलेली आहे. तरी सुध्दा डॉ. पद्याकर पंडीत कार्यरत आहेत. त्यामुळे त्याची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

  • गेली दोन वर्षापासून डॉ. पद्याकर पंडीत मनपाकडे विशेष कार्य अधिकारी पदावर नियुक्त असून अद्याप सदरचा अभ्यासक्रम सुरु झालेला नाही. त्यातच या अभ्यासक्रमासाठी विविध संवर्गांतील पदे मानधनावर भरण्यात आलेली आहेत. हि मानधनावरील पदे नियबाह्य पध्दतीने कुठल्याही प्रकारची जाहीरात न नियमित वेतनश्रेणीमध्ये भरण्यासाठी फेब्रुवारीच्या महापालिका सभेपुढे उपसुचनेव्दारे प्रयत्न करण्यात आला. परंतु, तो सफल झाला नाही. यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे.

अशा क्रियाशुन्य, बेजबाबदार, भष्ट्राचारी विशेष कार्य अधिका-यांची मनपास गरज नाही. ते वयाच्या अर्हतेमध्येही बसत नाहीत. त्यामुळे त्यांना तात्काळ राज्य शासनाच्या सेवेमध्ये परत पाठविण्यात यावे. शासनाकडे या अभ्यासक्रमासाठी नविन हुशार अनुभवी ज्येष्ठ अधिका-यांची मागणी करण्यात यावी. अथवा, मनपातील पात्र ज्येष्ठ वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button