breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कॉंग्रेस शहराध्यक्षापदासाठी इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रर्दशन

पिंपरी |महाईन्यूज|

राष्ट्रीय काॅंग्रेसच्या (आय) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी आज (मंगळवारी) इच्छुकांची मांदियाळी दिसून आली. शहर काॅंग्रेस कार्यालयासमोर इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रर्दशन केले. प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस आणि पक्ष निरीक्षकांनी पंधरा जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून कोणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रीय काॅंग्रेस (आय) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पद हे रिक्त आहे. मागील सहा ते सात वर्षापासून ते शहराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. मात्र, काॅंग्रेस शहराध्यक्ष पदावर एकाच व्यक्तींचा कार्यकाल संपुष्टात येवून नवीन चेह-यांना संधी मिळत नसल्याने अन्य पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच काॅंग्रेस पक्षात अंतर्गत धूसफूस सुरु होवून गट-तटाचे राजकारण सुरु झाले होते. त्यामुळेच साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन चेह-यांना संधी देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.

काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह कार्यालयासमोर शक्तीप्रर्दशन केले. इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्‍न विचारून त्यांची मते आजमावून घेतली. आता या बाबतचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईहून शहराध्यक्ष पदाची घोषणा होणार आहे. दरम्यान, कोणाला पद मिळणार याबाबत इच्छुकांसह समर्थकांना उत्सुकता लागली आहे.

काॅंग्रेस शहराध्यक्ष पदांसाठी हे आहेत इच्छुक – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान कॉंग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, असंघटित कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button