breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उद्योजक गौतम पाषाणकर यांना शोधण्यात पुणे पोलिसांना यश

पुणे |महाईन्यूज|

ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणेपोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत.

गौतम पाषाणकर हे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते. त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती. पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले. त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी घरासमोरुन बाहेर पडल्यावर ते थेट स्वारगेटला आले होते. तेथून त्यांनी भाड्याची एक कार ठरविली व ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button