breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वाहने भाडेतत्त्वावर घेतली अन्ं… ‘वेगळ्याच’ धंद्यासाठी वापरली

येरवडा पोलिसांनी केला पर्दाफाश, टोळीने 76 कारचा केला अपहार

पुणे ः वाहने भाडेतत्त्वावर घेऊन एका टोळीने तब्बल 76 कारचा अपहार केल्याची बाब पोलिस येरवडा पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. कराराप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना गाडी भाड्याने न देता त्या अवैधपणे दारू वाहतुकीसाठी देण्यात आल्या होत्या.

आशिष गंगाराम पुजारी (वय 32, रा.पालघर), सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा (30,रा.वसई, पालघर) आणि अयान ऊर्फ राहुल ऊर्फ अन्थोनी पॉल छेतीयार (38,रा.मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींचे साथीदार हैदलअली आलंदार हुसेन सय्यद (रा.लोहगाव,पुणे), सादिकेत अकबर अहमद (रा. ठाणे) आणि मुन्ना चाचा (पूर्ण नाव नाही) हे तीनजण पसार झाले आहेत. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात श्रीधर मुरलीधर जगताप (वय 30, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हैदरअली सय्यद याने त्याच्या साथीदारांसह येरवड्यातील प्रतीकनगर येथे द सिटी ट्रॅव्हल्स नावाने कंपनी सुरू केली. आरोपींनी जगताप यांची इनोव्हा कार व इतर साक्षीदारांच्या स्विफ्ट डिझायर, इर्टिगा, इन्होवा, एक्‍सेंट अशी वेगवेगळी 75 वाहने करार करून भाडेतत्त्वावर घेतली. मात्र, करारात ठरल्याप्रमाणे भाड्याची रक्कम दिली नाही. तसेच वाहने सरकारी अधिकाऱ्यांना भाड्याने न देता अवैध दारू वाहतुकीसाठी वापरले. संबंधित गाड्या मूळ मालकांना परत न करता त्यांचा अपहार केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button