breaking-newsराष्ट्रिय

केरळमध्ये मास्क न घातल्यास 10 हजार दंड चा निर्णय, 2021 पर्यंत निर्बंध

तिरुवनंतपुरम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने निर्बंध अधिक कठोरकेले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य असेल. त्यासोबत जर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार, असंही करेळ सरकारने नव्या नियमात सांगितले आहे. कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापरावा लागेल. त्यासोबत प्रत्येक ठिकाणी 6 फूट अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागेल.

लग्न समारंभात 50 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यासोबत अंतयात्रेत फक्त 20 लोकं सहभागी होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सभा, गेट-टुगेदर, जुलूस, धरणे आंदोलनं किंवा इतर कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आयोजित केले जाऊ शकत नाही. त्यासोबत अशा प्रकारच्या कार्यक्रमात फक्त 10 लोकं सहभागी होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त लोकं सहभागी होऊ शकत नाही.

दुकानं आणि इतर व्यावसायिक आस्थापनामध्ये एकावेळी 20 पेक्षा अधिक ग्राहक नसावे. त्यासोबत सर्व ग्राहकांना 6 फूट सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते किंवा फुटपाथवर थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आंतरराज्य प्रवासासाठी पासची गरज लागणार नाही. पण प्रवाशांना Jagratha ई-प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करावे लागेल.

भारतातील पहिला कोरोना रुग्ण हा जानेवारी महिन्यात केरळमध्ये आढळला होता. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 204 आहे. केरळ राज्याने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर कंट्रोल मिळवला आहे, असं वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button