breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महानगपालिकेच्या माहितीनुसार आज समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता…

मुंबई महानगपालिकेच्या माहितीनुसार, आज म्हणजे 6 जुलै रोजी पुन्हा एकदा समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी अरबी समुद्रात 4.67 उंच लाटा उसळण्याचा अंदाज बीएमसी तर्फे वर्तवण्यात आला होता. मागील सलग तीन दिवसांपासून मुंबईत समुद्रात मोठी भरती होत आहे.

आज सकाळपासून मुंबई सह उपनगरात सुद्धा पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मुंबईत अधून मधून जोरदार सारी बरसतील मात्र सलग दिवसभर पाऊस असा राहणार नाही. असे असले तरी वारीचा वेग समुद्रालगतच्या भागात अधिक असेल त्यामुळे मच्छिमारीसाठी समुद्रात जाणे टाळावे असे सूचित करण्यात आले आहे.

मुंबई सह ठाणे, रायगड, कोकण, तळकोकण या भागात सुद्धा मागील ३ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, समुद्री भरतीच्या वेळी किनाऱ्यालगत राहणाऱ्या घरांना बराच धोका असतो. कालसुद्धा पावसाच्या जोर जास्त असल्यानं काही भागात पाणी साचलं होत तर, अनेक घरात पाणी शिरल्याचे दृश्य सोशल मीडिया वर पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button