breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

वुहान | चीनमध्ये कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. या विषाणूमुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चीनमधील हुबेई प्रांतात कोरोना विषाणूमुळे मागील २४ तासांत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्येने २०००चा आकडा पार केला आहे.

सरकारच्या मते, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे दगावणाऱ्यांचा आकडा २००४ पर्यंत पोहोचला आहे. एकूण ७४,१८५ कोरोना विषाणूंची प्रकरणे समोर आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) सांगितले की, कोरोना विषाणूमुळे २००४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७४९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

आयोगाने म्हटले, ज्या १३६ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १३२ हुबेईमधील हेइलोंगजियांग, शानदोंग, गुआंगदोंग आणि गुईझोऊमध्ये एक-एक व्यक्ती दगावले आहेत. यातील ११८५ नवीन संशयीत प्रकरणे समोर आली. मंगळवारी २३६ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. तर १८२४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button