breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,84,773 वर

  • मुंबईत 586, पुण्यात 725 नवे रुग्ण

मुंबई – गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 3,880 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,84,773 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,350 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 65 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,74,255 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,499 वर पोहोचला आहे. तर सध्या 60,905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 586 नवे रुग्ण आढळले, तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,84,990 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,013 इतका झाला आहे. तसेच काल 499 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,66,101 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 7,031 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 725 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3.63 लाखांवर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7,654 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 3.4 लाख व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच सध्या 16,865 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button