breaking-newsआंतरराष्टीय
केनियातील आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू
नॅरोबी – केनियाची राजधानी नॅरोबीत असलेल्या मुख्य बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 15 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 50 हून अधिक नागरिक जखमी आहेत. अचानक लागलेली ही आग इतकी भयंकर होती, की काही मिनिटांतच आगीने अनेक इमारतींपर्यंत पसरली.
ही आग जिकोम्बा मार्केटमध्ये लागली असून ते राजधानीतील सर्वात मोठे खुले मार्केट आहे. काही स्थानिक माध्यमांनी या आगीचे कारण दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
मृतांपैकी काहींचा मृत्यू होरपळून तर काहींचा गुदमरून झाला आहे.
मार्केटमध्ये अधिक वर्दळ असली तरीही बाहेर पडण्यासाठी जास्त रस्ते नाहीत. त्यामुळे, आगीनंतर गुदमरून आणि चेंगराचेंगरीत अधिक जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे.