breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारची घोषणा!

Ram Mandir Ayodhya | २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सअयोध्येत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, केंद्र आणि योगी सरकारकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने मोठी घोषणा केली. २२ जानेवारीला देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, अयोध्येतील श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सोहळ्यात सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत आहे. त्यानुसार, २२ जानेवारीला देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस अर्थात दुपारी २:३० वाजेपर्यंत बंद असतील.

हेही वाचा  – पुणे ते अयोध्या १५ विशेष ट्रेन सुरु होणार; कधी अन् केव्हा? जाणून घ्या सविस्तर…

राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विधी केले जात आहेत. यापूर्वी बुधवारी (१७ जानेवारी) कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली.२१ जानेवारीपर्यंत हे विधी चालणार आहेत.

रामललाचा अभिषेक कार्यक्रम २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजता समाप्त होण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार आहेत. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button