breaking-newsआंतरराष्टीय

पुतीन-ट्रम्प शिखर परिषद 16 जुलै रोजी हेलसिंकी येथे

वॉशिंग्टन (अमेरिका) – पुढील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शिखर परिषद होणार आहे. खुद्द डोनॉल्ड्‌ ट्रम्प यांनी बोलून दाखवलेल्या शक्‍यतेनुसार पुढील महिन्यात फिनलॅंडचे राजधानी हेलसिंकी यथे ट्रम्प-पुतीन यांची शिखर परिषद होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांने मॉस्को येथे रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील शिखर परिषद लवकरच एखाद्या तिसऱ्या देशात होणार असल्याचे पुतीन यांचे परदेश व्यवहार सल्लागार युरी उसाकोव्ह यांनी सांगितले होते. वॉशिंग्टन आणि क्रेमलिन दोघांनीही ट्रम्प-पितीन शिखर परिषदेची तारीख आणि ठिकाण एकाच वेळी जाहीर केले आहे.

डोनॉल्ड ट्रम्प दि. 11 आणि 12 जुलै रोजी ब्रुसेल्स येथे होणाऱ्या नाटो शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्या नंतर ते पुतीन यांची भेट घेतील. त्याशिवाय ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांच्या भेटीसाठी ते लंडनला जाण्याची शक्‍यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

रशिया चीन आणि अन्य देशांबरोबरही चांगले संबंध असणे ही चांगली गोष्ट असल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. युरोप दौऱ्यात कधी तरी आमची भेट होऊ शकेल असे ट्रम्प यांनी पोलंडचे राष्ट्रपती रिबेलो डी सोसा यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार 16 जुलै रोजी हेलेसिंकी येथे शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाच्या काळात ट्रम्प आणि पुतीन यांची दोन वेळा भेट झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button