breaking-newsआंतरराष्टीय

S-400 लवकर द्या, भारताने रशियाला असं का सांगितलं?

S-400 मिसाइल सिस्टिम खरेदी व्यवहारात भारताने रशियाला ६ हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. आता भारत लवकरात लवकर ही सिस्टिम हस्तांतरीत करण्याची विनंती करणार आहे. एस-४०० चे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टिम शत्रूची फायटर विमाने, ड्रोन, आणि मिसाइल्स शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. भारताने ऑक्टोंबर २०१८ मध्ये रशियाबरोबर पाच एस-४०० सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. एकूण ४० हजार कोटीचा हा व्यवहार आहे.

आज मॉस्कोत होणाऱ्या भारत-रशिया लष्करी सहकार्यासंबंधीच्या बैठकीत भारताकडून ही मागणी करण्यात येईल. भारताने रशियाबरोबर अकुला-१ ही अणवस्त्र पाणबुडी १० वर्षांपासाठी भाडयावर घेण्याचा करार केला आहे. ही पाणबुडी आयएनएस चक्रची जागा घेईल. २०२५ पर्यंत अकुला-१ भारतीय नौदलात दाखल होईल. तो पर्यंत आयएनएस चक्रचा भाडेकरार वाढवण्याची शक्यता आहे.

ठरलेल्या करारानुसार ऑक्टोंबर २०२० ते एप्रिल २०२३ पर्यंत भारताला पाच एस-४०० सिस्टिम मिळतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सेंट पिटसबर्ग येथील एस-४०० च्या उत्पादन प्रकल्पस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. एस-४०० करारातील १५ टक्केचा पहिला हप्ता द्यायला विलंब लागला. पण आता हे पैसे देण्यात आले आहेत. ठरलेल्या मुदतीत मिसाइल सिस्टिम देण्याचे आश्वासन रशियाने दिले आहे. पण भारताचे त्याआधी ही मिसाइस सिस्टिम मिळवण्याचे प्रयत्न आहेत.

२७ फेब्रुवारीचा डॉगफाइटचा प्रसंग लक्षात घेता भारताकडे अशी सिस्टिम असणे आवश्यक आहे. कारण त्यादिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा बळकट करण्यासाठी एस-४०० सारखी सिस्टिम अत्यावश्यक आहे.

कशी आहे S-400 सिस्टिम
एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण ६०० किमी अंतरावरील १०० लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते. ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.

रशियाने १९८०च्या दशकाच्या अखेरीस एस-४०० विकसित करण्यास सुरुवात केली आणि २००७ साली ही यंत्रणा रशियन सेनादलांत सामील झाली. रशियातील मॉस्कोसह काही शहरांना या प्रणालीचे संरक्षण आहे. रशियाने सीरियातील नाविक आणि हवाई तळ आणि युक्रेनकडून बळकावलेल्या क्रिमिया प्रांतात एस-४०० प्रणाली तैनात केली आहे.
एस-४०० ही त्यापूर्वीच्या एस-३०० या क्षेपणास्त्र प्रणालीची सुधारित आवृत्ती आहे. तिला नाटोने एसए-१० ग्रंबल असे नाव दिले होते. त्यातील ‘४८ एन ६ ई’ या क्षेपणास्त्राचा पल्ला ५ ते १५० किमी आहे. ती अधिकतम ३० किमी उंची गाठू शकतात. सोव्हिएत सेनादलांत ती १९७९ पासून कार्यरत आहेत. भारतीय सेनादलांत एस-३०० प्रणाली यापूर्वीच कार्यान्वित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button