breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

केंद्र सरकार देश चालवण्यात पूर्णपणे विफळ: आमदार अबू आसिम आजमी

मुंबई : समाजवादी पार्टी तर्फे आमदार अबू आसिम आजमी यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाच्या माध्यमाने पेट्रोल आणि डीजेल च्या वाढत असलेल्या किमतीवर केंद्र शासनावर टीका करत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. वाढत असलेल्या पेट्रोल – डीजेल च्या किमतीबाबत सायकलवर राज्य सरकारच्या विरोधात फलक लावून ती राज भवन पर्यंत चालवत अबू आजमी ने आपली नाराजगी व्यक्त केली.

यावेळेस केंद्र सरकारवर निशाना साधत केंद्र सरकार देश चालवण्यामध्ये पूर्णपणे विफळ झालेली असून अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे भावामध्ये घसरण आलेली असतानासुद्धा देशामध्ये पेट्रोल – डीजेल चे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असल्याची टीका यावेळी करण्यात आली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि ज्या पद्धतीने रोज कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. त्याप्रकारे दिवसेंदिवस महागाईसुद्धा वाढत चालली आहे. २० लाख करोड रूपायच्या योजनाची घोषणा कारण्यात आली आहे पण कोणाला आतापर्यंत योजनेचा फायदा मिळालेला नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणत आहे कि भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांकडून भाडे घेऊ नका पण ज्या लोकांचे घर भाड्यावर चालते अशा लोकांनी त्यांच्या परिवाराचे पालनपोषण कसे करायचे. लॉक डाऊन मुळे सर्व व्यवसाय व व्यापार बंद होते पण आता लॉक डाऊन शिथिल झाल्यावर दुकाने उघडलेली असताना सध्या दुकानावर कोणी गिऱ्हाईक येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत सरकारतर्फे छोट्या व्यापाऱ्यांसाठी कोणतीही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. आज पूर्ण देशामध्ये खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आज लोक दोन वेळचे जेवण मिळत नसल्यामुळे भूकबळी चे शिकार होत आहे. पण त्याएवजी सरकार फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे. तसेच लॉक डाऊन मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा आदेश दिलेला आहे. जे अंतरराष्ट्रीय शाळा आहे ज्यांच्या फी लाखो रुपय असतात अशांना काही फरक पडणार नाही. पण ज्या छोट्या खासगी शाळा आहेत ज्यांच्याजवळ कसला निधी नसतो आणि ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या फी वर अवलंबून असतात अशा शाळेतील गरीब शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन छोट्या खासगी शाळा कसे देणार. सरकार छोट्या खासगी शाळा आणि व्यापाऱ्यांना उभा राहण्यासाठी बिनव्याजी कर्ज देणार का असा प्रश्न अबू आजमी ने उपस्थित केला. तसेच, सरकार वाढत असलेले इंधना चे भाव व महागाई साठी कोरोना ला जिम्मेदार ठरवून आपला जीव वाचवेल केंद्र सरकार पूर्णपणे विफळ ठरलेले असून खराब पारीस्थिती कडे चालली आहे. म्हणून माझे निवेदन अआहे कि पेट्रोल डीजेल चे वाहने विकून सायकल चालवा. पुढे बोलताना अबू आजमी ने कडव्या शब्दात सांगितले कि केंद्र सरकार ने देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खराब केली असल्याचा गंभीर आरोप करत सरकार खोटे आश्वासन देऊन फक्त लोकांचे लक्ष भटकवत आहे. पण आता जनतेला कळत आहे कि फक्त त्यांचा वापर होत आहे.

राज्यपालांना निवेदन देत असतांना आमदार अबू आसिम आजमी सह, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, नगरसेविका रुक्साना सिद्दिकी, समाजवादी पार्टी चे प्रमुख महासचिव मेराज सिद्दिकी, महासचिव अब्दुल कादिर चौधरी, महासचिव कुबेर मौर्या, जुल्फेकार आजमी, अबरार अहमद सिद्दिकी, सलीम मिर्जा व आशीष ठाकूर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button