breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे नवे दहा रूग्ण; वृध्द महिलेचा मृत्यू
सोलापुरात मंगळवारी दिवसभरात करोनाबाधित दहा नवे रूग्ण आढळून आले. तर एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधित रूग्णसंख्या १३५ वरून १४५ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही नऊपर्यंत गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या २४ रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.