breaking-newsमुंबई
पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रतिलिटर १० पैशांनी वाढ
मुंबई – काल एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रतिलिटर १० पैशांनी वाढ झाली आहे. परंतु डिझेलचे दर मात्र आज सलग १९व्या दिवशी स्थिर आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल कोणताही बदल झालेला नव्हता. मात्र आज पेट्रोलचा दर लिटरमागे १० पैशांनी वाढला असून डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. जुलैमध्ये डिझेलचे दर १० वेळा वाढले होते. त्यामुळे त्या महिन्यात डिझेल प्रतिलिटर १.६० रुपयांनी महागले. आज दिल्लीत पेट्रोल १० पैशांनी महागल्यामुळे त्याचा दर ८१ रुपये लिटर झाला आहे, तर डिझेल ७३ रुपये ५६ पैसे लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १० पैशांनी महागल्यामुळे त्याचा दर ८७ रुपये ६८ पैसे झाला आहे. डिझेल मात्र ८० रुपये ११ पैसे लिटर आहे. कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू येथेही पेट्रोल १० पैसे लिटरने महागले आहे.