ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

शेअर बाजारात नुकसान टाळायचे असेल तर वाचा…

2022 मध्ये शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 5 टक्क्यांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काही खास टिप फॉलो केल्या तर ते बाजाराच्या या घसरणीपासून स्वत:चे नुकसान टाळू शकतात.

गेल्या आठवड्याभरात बाजार 5 टक्क्यांनी खाली आला आहे. अशावेळी जर तुम्ही 1000 रुपयांचा स्टॉक घेतला असता तर तुमचे फक्त एकूण 50 रुपये नुकसान झाले असते, मात्र ज्यांनी 10 लाखांची गुंतवणूक केली असेल त्यांना 50 हजारांचे नुकसान झाले असते. यावरून हे स्पष्ट होते की पोर्टफोलिओमधील संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी गुंतवू नये.

महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजारातील धोका टाळण्यासाठी बहुतांश गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला बाजाराचे जास्त ज्ञान नसेल, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडणे चांगले. यामुळे तुम्हाला मार्केटबद्दलची तुमची समज वाढवण्यासाठी वेळ मिळेल.

तसेच इक्विटी म्युच्युअल फंडातही एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दरमहा थोडीशी रक्कम गुंतवावी. याद्वारे तुम्ही कोणतीही जोखीम न घेता उच्च परतावा मिळवू शकता. बाजारातील घसरण किंवा वाढीचा अशा SIP वर अचानक परिणाम होत नाही, जे पोर्टफोलिओ स्थिर ठेवतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button