breaking-newsराष्ट्रिय

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील ७ लाख पदे रिक्त

नवी दिल्ली : गेल्या वर्षी १ मार्च रोजीच्या स्थितीनुसार, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ७ लाख पदे रिक्त होती, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली.

एकूण ६ लाख ८३ हजार ८२३ पदांपैकी, ५७४२८९ पदे गट ‘क’ मधील, ८९६३८ पदे गट ‘ब’मधील, तर १९८९६ पदे गट ‘अ’ मधील आहेत. १ मार्च २०१८ रोजीची ही आकडेवारी आहे, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.संबंधित विभागांनी उपलब्ध करून दिलेल्या या आकडेवारीच्या आधारे कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० या वर्षां १०५३३८ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असल्याचेही सिंह म्हणाले.

नव्या, तसेच येत्या दोन वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या रिक्त जागा लक्षात घेऊन २०१७-१८ या वर्षांत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे निवड मंडळ यांनी गट ‘क’ आणि स्तर-१ मिळून एकूण १२७५७३ रिक्त जागांसाठी केंद्रीकृत भरती अधिसूचना जारी केली असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

टपाल विभागानेही रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करून, १९५२२ जागा भरण्याकरिता अधिसूचना जारी केली आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध श्रेणींमधील जागा भरण्यासाठीच्या जागांव्यतिरिक्त या जागा असल्येचेही सिंह यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button