breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्रात भाजपला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दलचा NDAला रामराम!

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपला रामराम केले आहे. जुना सहकारी शिरोमणी अकाली दल यांनी एनडीएतून काढता पाय घेतला आहे.

कृषी विधेयकावरून शिरोमणी अकाली दल आणि केंद्र सरकारमध्ये वादंग सुरू झाले होते. केंद्र सरकारने कृषी विधेयक, किमान हमी भावासंदर्भातील धोरणावर भूमिका न बदलल्याने शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवे कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी राजीनामा दिला होता. आता शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहे. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत. त्यामुळे हा भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button