breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

नवी दिल्ली – सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन झाले आहे. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. रणजीत सिन्हा यांनी आपल्या कारकीर्दीत सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती. ते बिहार कॅडरचे १९७४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१२ ते २०१४ दरम्यान ते सीबीआयच्या संचालकपदी होते.

गुरुवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता असे वृत्त पीटीआयने दिले आहे. दरम्यान, २२ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख बनवण्यात आले होते. रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्त्व तसेच पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर काम केले होते. महत्त्वाचे म्हणजे रणजीत सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयचे प्रमुख असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच २०१४ मध्ये त्यांच्या पत्नीने पाटणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button