breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनाही शरद पवारांचा धसका – मंत्री धनंजय मुंडे

पिंपरी | प्रतिनिधी

सत्ता हातात आलेली असतानाही आणि जास्त आमदार निवडून आले तरी विरोधी पक्षात बसविण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्ये आहे. पवार यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा केंद्रातील सत्ताधारी पक्ष धसका घेत असल्याचा उपरोधिक टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपला नाव न घेता मारला.

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री मुंडे बोलत होते.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी या वेळी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाले की, उत्तर भारतात सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या शेती धोरणाच्या विरोधात कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. तरी केंद्र सरकार त्यांची बाजू एकूण घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला श्रवणयंत्र पाठविणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांना ऐकायला जाईल. मात्र तरीही त्यांनी ऐकले नाही तर श्रवणयंत्राखाली वाजविण्याची सोय असली पाहिजे असे प्रतिपादन या वेळी मुंडे यांनी केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप बदनाम करत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन या वेळी मुंडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button