breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

कॅस्टर ऑईल सौंदर्य आणि आरोग्यासाठी असतं वरदान

कॅस्टर ऑईल म्हणजेच अर्थात एरंडाचं तेल जे सौंदर्य आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जातं. साधारण पिवळ्या रंगाचं असलेलं हे तेल खूपच उपयोगी आहे.  कॅस्टरच्या बिया ठेचून त्यातून एक थंड आणि चिकट पदार्थ निघतो, ज्यापासून हे तेल बनवण्यात येतं. वैज्ञानिक भाषेमध्ये याला रिसिनस कॉम्यूनिस म्हणून ओळखण्यात येतं. कॅस्टरचं झाड हे केवळ भारत आणि आफ्रिका या दोनच देशांमधील काही जंगलांमध्ये सापडतं. कॅस्टर ऑईलच्या वापराने तुमची त्वचा आणि केसांची समस्या या पटकन सुटतात. तसंच आरोग्यासाठी कोणत्याही वनस्पतीपेक्षा हे कॅस्टर ऑईल कमी नाही. कॅस्टर ऑईलचे तुमच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी नक्की काय काय फायदे होतात, हे ऑईल कसं वरदान ठरतं याबद्दल अधिक जाणून घेऊया. 

कॅस्टर ऑईलमध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात. या गुणांमुळे याचा प्रयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. केमिकलयुक्त उत्पादनांंमध्ये प्रयोग करण्याऐवजी नैसर्गिक कॅस्टर ऑईल त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देतं. त्यामुळे सौंदर्यासाठी आणि अधिक चांगली त्वचा मिळवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो…

त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी

त्वचा तीन प्रकारची असते. कोरडी, तेलकट आणि कॉम्बिनेशन. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी एरंडाचं तेल हे वरदान ठरतं. तुम्ही जर कोरड्या त्वचेमुळे हैराण असाल तर कॅस्टर ऑईलचा वापर नक्की करा. याचा तुम्हाला फायदा मिळतो. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये कायम ओलावा राहातो. 

पिंपल्सची समस्या नष्ट होते

साधारणतः तेलकट त्वचा अथवा पिंपल्सच्या समस्या असतील तर कोणतंही तेल त्यावर लावण्यासाठी मनाई करण्यात येते. पण एरंडाचं तेल पिंपल्ससाठी अतिशय फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर एक्ने (Acne) प्रोन असतील तर तुम्ही कॅस्टर ऑईल वापरा त्याने कोणतंही नुकसान होणार नाही. 

वाढतं वय लपवण्यास होते मदत

अँटी एजिंगसाठी हे तेल फायदेशीर समजण्यात येतं. तुम्ही जर या तेलाचा उपयोग नित्यनियमाने केला तर वाढतं वय लपवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे तुमची त्वचा हायड्रेट करतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या (Wrinkles) असल्यास त्याची समस्या दूर होते आणि त्वचा मऊ, साफ आणि तरूण दिसते. 

मॉइस्चराईजरला म्हणा गुडबाय

कॅस्टर ऑईल त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठीही मदत करतं. तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी स्वस्त आणि घरगुती उपाय शोधत असाल तर कॅस्टर ऑईलपेक्षा चांगला उपाय तुम्हाला मिळूच शकत नाही. याचा वापर केल्यानंतर तुम्ही केमिकलयुक्त मॉईस्चराईजर वापरणं स्वतःहून सोडून द्याल

स्ट्रेच मार्क्ससाठी उपयुक्त

गर्भावस्थेनंतर बऱ्याचदा महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या असते. डिलिव्हरीनंतर काही दिवसांपर्यंत पोटाचा खालच्या बाजूची त्वचा ही खेचली जाते. बऱ्याचदा त्वचेवर स्ट्रेच मार्क्स असल्यानंतर आपल्याला हवे तसे कपडे घालता येत नाहीत. त्यामुळे कॅस्टर ऑईलने मालिश केल्यानंतर स्ट्रेच मार्क्सचे डाग निघून जाण्यास मदत होते. तुम्हाला यासाठी व्यवस्थित मसाज करता यायला हवा. 

चेहऱ्यांवरील डागांपासून मिळते सुटका

तुमच्या चेहऱ्यावर डाग (Face blemishes) असतील अथवा तुम्ही पिंपल्सने त्रासला असाल तर त्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑईलचा वापर करू शकता. एरंडेलच्या तेलामध्ये आढळळणारे फॅटी अॅसिड चेहरा साफ करतं. हे फॅटी अॅसिड्स त्वचेच्या स्कार टिश्यू (Tissue) मध्ये प्रवेश करतात आणि चारही बाजूने टिश्यूचा विकास करून डाग काढून टाकण्यास मदत करतात. 

डार्क सर्कल्सपासून मिळते सुटका

रात्री उशीरापर्यंत जागण्याने अधिक तणावाच्या स्थितीत डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. हे काळे डाग अर्थात डार्क सर्कल्स विचित्र दिसतात. यामुळे व्यक्तीची नक्की मानसिक स्थिती काय आहे हे समजून येतं. तुम्हालासुद्धा अशी समस्या असेल तर एरंडेल तेलाचा वापर तुम्ही करू शकता. 

ओठांसाठी वरदान
काही लोकांना काळजी घेऊनही ओठ काळे होण्याची समस्या असते त्याचबरोबर त्यांचे ओठ जास्त प्रमाणात फुटतात. अधिक धुम्रपान (Smoking) केल्याने अथवा लिप केअरचा अधिक वापर केल्याने अशी स्थिती उद्भवते. तुमच्या ओठांचा गुलाबी रंग परत मिळवण्यासाठी तुम्हाला कॅस्टर ऑईलचा उपयोग करता येतो. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button