breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या प्रसिद्ध होणार प्रारूप प्रभाग आराखडा…

  • वाचा… तो कुठे व कसा? पहावयास मिळणार…

पिंपरी |

Draft ward plan for Pimpri-Chinchwad municipal elections will be released tomorrow …महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग आराखडा उद्या १ फेब्रुवारीला जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे स्वतंत्र आणि एकत्रित नकाशे आणि त्यात समाविष्ट भागांची माहिती देणारे फलक महापालिका भवनासह सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात मंगळवारी (दि. १) सकाळी दहाच्या दरम्यान लावण्यात येणार आहेत. तसेच, महापालिकेच्या www pcmcindia.gov.in संकेतस्थळावर नकाशे व माहिती पाहता येणार आहे.

पालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालय व महापालिका भवनात सर्व ४६ प्रभागांचा एकत्रित नकाशा, सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे व त्यात समाविष्ट असलेला भाग व त्याच्या चतु:सीमेची माहिती असलेले फलक व राजपत्र लावले जाणार आहेत. त्याबाबत जाहीर प्रकटन मंगळवारीच वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रभागरचनेवर सूचना व हरकती लेखी स्वरूपात समक्ष द्याव्या लागणार आहेत, ऑनलाइन स्वीकारल्या जाणार नाहीत. त्या संदर्भातील कार्यवाही आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी स्पष्ट केले.

  • प्रभाग रचना निवडणूक कार्यक्रम…

निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणे व त्यास प्रसिद्धी देणे – मंगळवार (दि. १ फेब्रुवारी २०२२)
प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी – मंगळवार ते सोमवारी (दि. १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२२)
प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे – बुधवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२२)
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती व सुचनांवर अंतिम सुनावणी – शनिवारी (दि. २६ फेब्रुवारी २०२२)
सुनावणीनंतर शिफारशी विहीत नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे – बुधवारी (दि. २ मार्च २०२२)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button