breaking-newsटेक -तंत्र

कॅम स्कॅनर हटवा, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ही जबरदस्त अॅप वापरून पाहा

चिनी अॅप वर बंदी आणल्यानंतर त्या अॅपला नवे पर्याय शोधले जात आहेत. डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी कॅम स्कॅनर अॅप प्रसिद्ध होते. मात्र राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेत त्यावर बंदी आणली आहे. या पेक्षा चांगले आणि तगडे पर्याय असलेले अॅप आम्ही येथे देत आहोत.

Tiny Scanner

डॉक्युमेंट स्कॅन करून त्याचे Pdf मध्ये रूपांतर करू शकतात. यात इमेज एडिटिंगचे पर्याय आहेत. कॉन्ट्रास्टचे 5 लेव्हल यात देण्यात आले आहेत.

Adobe scan

डॉक्युमेंट स्कॅन सोबतच ओसीआर तंत्रज्ञानामुळे प्रिंट केलेलं टेक्स्टला हस्ताक्षरात बदलता येतं. यामध्ये ऑटो टचचा पर्याय देखील आहे.

Microsoft office lens

डॉक्युमेंट स्कॅन करुन त्याला अधिक चांगले बनवण्याचा पर्याय आहे. फोटोला पीडीएफ, वर्ड , पॉवर पॉइंट मध्ये बदलू शकतं हे एप.

Scan pro app

200 dpi वर डॉक्युमेंटे स्कॅन करण्याचा पर्याय मिळतो. अटोमॅटिक एज डिटेक्शन आणि मल्टी पेज स्कॅनिंग करता येतं.

Turbo scan

यामध्ये अत्यंत शार्प स्कॅनिंग करता येतं आणि surescan मोड देखील यामध्ये आहे. 3 सेकंदात पेज स्कॅन करता येतं. वन टॅप एडिटिंग मुळे हे अॅप अधिक फायदेशीर ठरते.

Genius Scan

2 कोटी हून अधिक युझर्स हे अॅप वापरत आहेत. यामध्ये ओसीआर आणि स्कॅनरसह सर्व बेसिक फिचर आहेत.

Document scanner

हे हिंदुस्थान मध्ये विकसित करण्यात आलेलं एप आहे. 50 हून अधिक एडिटिंग आणि मॅनेजिंग टूल सोबत QR कोड स्कॅनचा पर्याय आहे.

Clear scan

अनेक फीचर्स या अॅप मध्ये आहेत. ओसीआर, स्कॅनिंग, फाईल बॅक अप, रिस्टोर, थर्ड पार्टी क्लाउड अॅपला सपोर्ट करतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button