breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: “अमेरिका कोरोना लसची टेस्ट करण्याच्या अगदी जवळ”, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

करोनाने अमेरिकेत थैमान घातलं असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अर्थव्यवस्था सुरक्षित आणि टप्याटप्याने सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. करोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी बोलताना करोना व्हायरस अमेरिकेच्या अर्थवयवस्थेवर करण्यात आलेला हल्ला असल्याचं सांगत चीनवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अमेरिकेत करोनामुळे ५० हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आठ लाखांहून अनेकांना लागण झाली आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावरील लस शोधण्याच्या अगदी जवळ असल्याची माहिती दिली आहे. “आम्ही लसची चाचणी करण्याच्या अगदी जवळ आहोत. जेव्हा चाचणी सुरु होते तेव्हा त्यासाठी बराच वेळ लागतो. पण आम्ही हे लवकरच पूर्ण करु,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितंल आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि व्हाइट हाऊसचे करोना व्हायरस टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा बीरेक्सही उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं की, “अमेरिका, जर्मनी, युके आणि चीनमधील लस लक्ष ठेवल्यानंतर आम्ही एका लसीच्या जवळ पोहोचलो आहोत”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “लस शोधून त्यावर काम करण्यासाठी आमच्याकडे अनेक हुशार लोक आहेत. पण दुर्दैवाने आम्ही अद्याप चाचणीच्या अगदी जवळ पोहोचलेलो नाही. कारण जेव्हा चाचणी सुरु होईल तेव्हा त्यासाठी वेळ लागतो. पण आम्ही ते पूर्ण करु”

अमेरिकेचे साथीचे रोग सल्लागार डॉक्टर अँथनी फौसी यांनी याआधी म्हटलं होतं की, “व्यापक प्रमाणात वापर करण्यासाठी लस मंजूर होण्यास १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागेल. अनेक आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की, लस तयार होण्यासाठी किमान १२ ते १८ महिने लागतात”.

उपराष्ट्राध्यक माइक पेन्स यांनी यावेळी बोलताना जो डेटा समोर येत आहे त्यानुसार करोनाविरोधातील लढाईत आम्ही प्रगती करत असल्याचं म्हटलं आहे. अनेक हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येत असून यश मिळवणं हे एकमे आमचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. जर आम्ही प्रयत्न सुरु ठेवले तर येणाऱ्या दिवसांमध्ये एक उत्तम देश म्हणून आम्ही पुन्हा आमचं स्थान कायम करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १६ राज्यांमधील निर्बंध शिथील करण्यासंबंधी विचार सध्या सुरु असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button