breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारतीय बनावटीच्या पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
बालसोर – भारतीय बनावटीच्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी रात्री ओडिशामधील बालसोरच्या लष्करी तळावर पार पडली. पृथ्वी-2 हे अण्विक क्षेपणास्त्र असून जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे.
या क्षेपणास्त्राने रात्रीच्या वेळी सर्व चाचण्या पूर्ण केल्या असून लवकरच त्याचा लष्करात समावेश होणार आहे. चांदीपूरच्या इंटिग्रेटेड रेंंजवर याची मारक क्षमता आजमावण्यात आली. पृथ्वी-2 हे क्षेपणास्त्र 350 किमीपर्यंत अचून लक्ष्य भेदू शकते, अशी माहिती डिआरडिओच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये वापरण्यात येणारे संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय बनावटीचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या वतीने हे क्षेपणास्त्र ऐच्छिक पद्धतीने निवडण्यात आले आणि डीआरडीओने ही सराव चाचणी पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.