breaking-newsराष्ट्रिय

कुलगाम जिल्ह्यात चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. हे तिघेही दहशतवादी पोलिस हवालदाराचे अपहरण आणि हत्येमध्ये सहभागी होते, असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी पोलिस हवालदार मोहम्मद सलीम शाह सुटीवर असताना कुलगाममधील मुताल्हामा भागातल्या घरातून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. शाह यांचा मृतदेह रेडवानी पयीन गावाजवळच्या नर्सरीमध्ये आढळून आला होता. शाह यांच्या मृतदेहावर दहशतवाद्यांकडून मारहाणीच्या आणि छळ झाल्याच्या खुणा होत्या, असे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.
पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्‍त गस्त पथकाने रेडवानी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवून या दहशतवाद्यांबाबतची माहिती मिळवली. हे दहशतवादी गजबजलेल्या वस्तीमध्येच असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केल्यावर काही काळ जोरदार चकमक झाली. त्यामध्ये हे तिन्ही दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांची कोणतीही जिवीत हानी झाली नाही. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीनचे सदस्य होते. त्यांच्याकडून 2 एके 47 रायफली, कार्बाईनसह काही शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button