ताज्या घडामोडीराष्ट्रिय

जामिया नगर परिसरात झालेल्या हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी दहा जण अटकेत

नवी दिल्ली | महाईन्यूज |

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामिया नगर परिसरात झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक करण्यात आलीये. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये एकही विद्यार्थी नाहीये. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. दहापैकी तीन जण हे परिसरातील BC म्हणजेच बॅड कॅरेक्टर घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेण्ड्स कॉलनीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात रविवारी 15 डिसेंबरला आंदोलन करताना न्यू फ्रेण्ड्स कॉलनीमध्ये काही समाजकंटकांनी उच्छाद मांडला. या आंदोलनादरम्यान तीन बस आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. इतकंच नाही तर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांपैकी एक गाडीही पूर्णत: नष्ट केली. सोबतच इतर वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात पोलिस दलातील दहा आणि अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीही यामध्ये जखमी झाले होते.

सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजच्या आधारे या आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सोमवारी 16 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, आंदोलनात स्थानिक सहभागी झाल्याने हिंसा वाढली. उच्छाद घालणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही आणि हिंसाचाराचे व्हायरल फुटेज तपासले असता या फुटेजच्या आधारावरच दहा स्थानिकांना अटक करण्यात आलीये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button