breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुख्यात वाळू तस्कर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी |महाईन्यूज|

सातारासह चार जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या कुख्यात वाळू तस्कर सोमाभाई चव्हाण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार पिस्तूल आणि दोन काडतूस हस्तगत केले आहेत. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतूस जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आजवर या प्रकरणात 47 गावठी पिस्टल आणि 68 जिवंत काडतूस जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेने जुलै 2020 मध्ये अवैध पिस्तूल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी 42 पिस्तूल, गावठी कट्टे आणि 64 काडतूस हस्तगत केले होते. या तपासात 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली होती.

याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय 30, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) याचेही नाव निष्पन्न झाले होते. त्याला उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली होती. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला 17 ऑगस्ट रोजी कारागृहातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले.

संतोष चंदू राठोड (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) याचे नाव पोलिसात तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी संतोष याच्यावर 2018 साली लोणावळा पोलीस ठाण्यात खुनाच्या त्याला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांनी संतोषला 10 ऑगस्ट रोजी अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी करत एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. त्याची सातारा परिसरात ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आणि “आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना आहे. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे दाखल आहेत. 2016 मधील निगडीतील कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी होता. तसेच 2018 मध्ये भाजपाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथच हा मुख्य सूत्रधार होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई. अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button